ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवरायांची जगदंबा तलवार भारतात परत आणावी यासाठी कोल्हापुरातील ‘शिवदुर्ग संवर्धन तर्फ ठिय्या आंदोलन

कोल्हापूर प्रतिनिधी :

शिवरायांची जगदंबा तलवार भारतात परत आणावी यासाठी कोल्हापुरातील ‘शिवदुर्ग संवर्धन आंदोलन’च्या काही तरुणांनी आंदोलन सुरू केले आहे. मात्र, शासनाकडून याबाबत कोणत्याही पद्धतीने लक्ष दिले जात नसल्याने हे शिवभक्त आज थेट ऐतिहासिक पन्हाळा गडावरील सज्जाकोटीमध्ये आंदोलनाला बसले आहेत. जोपर्यंत आम्हाला शासनाकडून जगदंबा तलवार परत आणण्याबाबत लेखी उत्तर मिळत नाही तोपर्यंत सज्जाकोटी मधुन उठणार नाही अशी आंदोलकांनी भूमिका घेतली आहे.
जगदंबा तलवार भारतात परत आणावी यासाठी शिवभक्तांचे पन्हाळगडावरील सज्जकोटीमध्ये ठिय्या आंदोलनकाय आहे नेमके प्रकरण -छत्रपती शिवरायांच्या अनेक तलवारींपैकी एक प्रमुख तलवार करवीर छत्रपती घराण्याकडे होती. त्याचे ‘जगदंबा तलवार असे नाव होते. आज इंग्लंडच्या राणीच्या व्यक्तिगत संग्रहात असणाऱ्या ‘रॉयल कलेक्शन ट्रस्ट’या ठिकाणी सेंट जेम्स पॅलेस येथे ही तलवार ठेवण्यात आली आहे. कोल्हापूर छत्रपतींच्या गादीवर छत्रपती महाराज चौथे हे अकरा वर्षांचे असताना इंग्लंडचा तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स (सातवा एडवर्ड) हा भारत भेटीवर आला होता. सन 1875-76 मध्ये त्यांना हीच जगदंबा तलवार भेट म्हणून दिली होती. हीच इंग्लंड येथे असणारी जगदंबा तलवार भारतात परत यावी, अशी शिवभक्तांची भावना आहे. रस्ता रोको आणि इंग्लड भारत सामन्यालाही यापूर्वी आंदोलकांकडून झाला विरोध -शिवरायांच्या अनेक महत्त्वाच्या तलवारींपैकी एक असलेली जगदंबा तलवार भारतात परत आणण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता सुद्धा शिवभक्त आक्रमक झाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाच्या माध्यमातून कोल्हापुरात रास्तारोको करत आंदोलन करण्यात आले होते. शिवाय हा विषय इंग्लंडच्या राणीपर्यंत पोहोचावा म्हणून ज्या ठिकाणी इंग्लंड आणि भारत दोघांमध्ये क्रिकेट सामना होणार होता त्या मैदानावरच भगवा ध्वज फडकवत आंदोलन करण्यात आले होते. आता शिवभक्त आणखी आक्रमक झाले असून थेट पन्हाळा गडावरील सज्जकोटीमध्ये आंदोलनाला बसले आहेत. शिवाय शासनाकडून जोपर्यंत लेखी उत्तर दिले जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा सुद्धा या आंदोलकांनी दिला आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks