ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे बेंगलोर हायवे लगत गायकवाड पेट्रोल पंपा शेजारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने टाकला छापा

कोल्हापूर प्रतिनिधी :

कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी लोकसभा निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने अवैध व्यवसाय, अंमली पदार्थ साठा व विक्री करणारे व रेकॉर्ड वर असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत.आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना त्यांचे गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, पेठ वडगांव पोलीस ठाणे हद्दीत पुणे ते बेंगलोर हायवे लगत असले गायकवाड पेट्रोल पंपाचे शेजारी असलेले हॉटेल जंम्भेश्वराय हायवे या हॉटेलचे पाठीमागील बाजूस लागून असलेले चार खोल्यांपैकी एका खोलीमध्ये अफू बोंडाचा साठा करून त्याची पावडर तयार करतात. तसेच गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी साठा करून ठेवला असल्या बाबतची खात्रीशीर बातमी मिळाली होती.

त्या बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे कडील सपोनि सागर वाघ व पोलीस अंमलदार यांचेसह जाऊन खात्री करून दि. 19.03.2024 रोजी सायंकाळी छापा टाकला असता आरोपी नामे 1 ) मनिष मोहनराम, वय 23,(समराथल हॉटेल, ओमसाई पेट्रोल पंप शेजारी, पुणे बेंगलोर हायवे लगत, पेठ वडगांव, कोल्हापूर) रा. उदयनगर, परिअल, जि. जोधपूर, राज्य- राजस्थान, 2) मोहन चोकलू चव्हाण, वय 45, धंदा व्यापार (चप्पल दुकान ) रा. हिंदमाता कॉलनी, वाठार, ता.हातकणंगले, कोल्हापूर, 3) अमिर सय्यद जमादार, वय 40, धंदा ट्रक मॅकेनिक, रा.प्रसाद हॉटेलच्या मागे, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर हे मिळून आले. त्या ठिकाणी एकुण 40 किलो 4 ग्रॅम वजनाचा अफू हा अंमली पदार्थ, 1 किलो 195 ग्रॅम वजनाची बारीक पावडर व 01 किलो गांजा असा एकूण 5,21,400/- कि. रू. चा अंमली पदार्थ विक्री करण्याचे हेतुने मिळून आला.

त्यांना मिळून आलेल्या मुद्देमालासह रितसर कायदेशीर प्रक्रिया करून ताब्यात घेवून त्यांच्याविरुध्द पेठवडगांव पो ठाणे येथे एनडीपीएस कायदया अंतर्गतगुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक, श्री. निकेश खोटमोडे-पाटील साो, श्रीमती जयश्री देसाई यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर, सपोनि सागर वाघ, सहा. फौजदार विजय गुरखे,विलास किरोळकर, नामदेव यादव, सचिन देसाई, महेश गवळी,अमित सर्जे,सागर चौगुले,प्रविण पाटील, विनोद कांबळे, चालक-महादेव कुहाडे, व चालक सुशिल पाटील यांनी केली आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks