ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापूर जिल्ह्यातील युवक-युवतींमार्फत कोटपा कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
१३ मार्च रोजी झालेल्या “धूम्रपान निषेध” दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील युवक युवतींमार्फत कोटपा कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी, मा.श्री.संजय तेली यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी डॉ. आंबेडकर शेती व संशोधन संस्थेच्या कार्यकर्त्या रविना माने युवा प्रतिनिधी म्हणून उपस्थित होत्या.बालके व युवकांना तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून दूर ठेवणे व त्यामुळे देशात होणारा मृत्युदर कमी करून आरोग्य चांगले ठेवणे हा यामागील मुख्य उद्देश होता.