मान नेसरीकरांचा,खेळ पैठणीचा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नेसरी प्रतिनिधी : पुंडलीक सुतार
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नेसरीच्या लोकनियुक्त सरपंच गिरीजादेवी शिंदे यांनी नेसरी येथे आयोजित केलेल्या मान नेसरीकरांचा, खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खाद्य महोत्सवाचे उदघाटन सहनिबंधक मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमाला अभिनेता योगेश पवार,अभिनेत्री श्रुतकीर्ति सावंत, रील स्टार जगदीश सुतार व प्रेक्षक,यांच्या उपस्थितीत हडलगे येथील सरिता पाटील यांनी प्रथम क्रमांक ची मानाची पैठणी पटकावली.महाराणी ताराराणी व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले.
यानंतर बोलताना सरपंच गिरीजादेवी शिंदे म्हणाल्या की सरपंच पद हे सेवेसाठी आहे.या पदाला योग्य न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहणार असून महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा,त्यांचे मनोरंजन व्हावे यासाठी आपण त्यांना व्यासपीठ या निमित्ताने उपलब्ध करून दिले आहे.
यावर्षी चा ताराराणी पुरस्कार भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदी निवड झालेल्या श्रेया देसाई हिला सरपंच गिरीजादेवी शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला,यावेळी स्थानिक देवस्थान समिती अध्यक्ष संग्रामसिंह शिंदे, विकास सेवा संस्थेचे चेअरमन यशोधन शिंदे,व्हा. चेअरमन संजयसिंह शिंदे,ऐश्वर्या शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती,यावेळी प्रमुख मान्यवरांची भाषणे झाली.
या कार्यक्रमात सरिता पाटील हडलगे यांनी 5 हजारांची पैठणी,ज्योती पेडणेकर यांनी4 हजाराची पैठणी,मनीषा मडीलगेकर यांनी 3 हजारांची पैठणी,गीता फगरे नेसरी यांनी कोल्हापुरी साज व साक्षी बराटे यांनी सोन्याची नथ मिळवून बक्षिसे प्राप्त केली.सूत्रसंचालन पत्रकार विनायक पाटील यांनी केले तर आभार एम. एस.तेली यांनी मानले.