ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मोठी बातमी : कोलकाता विमानतळावर भीषण आग, विमानांची ये-जा थांबवली

नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय (कोलकाता) विमानतळाच्या आत आग लागली आहे. ३ सी निर्गमन टर्मिनल इमारतीत ही मोठी आग लागली आहे, विमानतळाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली. काही वेळानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवण्यात आले आहे.
चेक-इन एरिया पोर्टल डी वर रात्री ९ वाजता किरकोळ आग लागली आणि धूर झाला. रात्री ९:४० पर्यंत पूर्णपणे आग आटोक्यात आणण्यात आली. दरम्यान सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून चेक-इन परिसरात धुरामुळे चेक-इन प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. आता चेक-इन आणि ऑपरेशन आता पुन्हा सुरू केले आहे, अशी माहिती , नेताजी सुभाष चंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली.