ताज्या बातम्यासामाजिक
सारिका संदीप लखमले यांची महा एन.जी.ओ. समितीच्या औरंगाबाद विभाग उपाध्यक्षपदी निवड.

पुणे :
नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र एन. जी. ओ. समिती ( महाराष्ट्र राज्य ) च्या झूम ऑनलाईन कार्यकारिणी बैठकीमध्ये सारिका संदीप लखमले यांची औरंगाबाद विभाग उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. ते गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेञात कार्य करत आहेत. निवडीनंतर नूतन राजाध्यक्ष युवराज येडुरे, राज्य उपाध्यक्ष डॉ.लक्ष्मी भारती, राज्य सचिव सचिन यादव, राज्य संपर्कप्रमुख संदिप बोटे, राज्य सदस्य डॉ.प्रियदर्शनी चोरगे, उषा देसाई, अमोल गोरे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.