मुरगुड : संत गाडगे महाराज यांच्या जयंतनिमित्तनिमित्त सरपिराजीराव तलावाची स्वच्छता

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
स्वच्छतेचे जनक म्हणून ज्यांची ओळख आहे अश्या संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुरगूडकरांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य जलस्त्रोत असलेल्या सरपिराजीराव तलावाची स्वच्छता करण्यात आली.
सर पिराजीराव तलावाच्या आयटीआय समोरील भागामध्ये आतील बाजूस प्रचंड अस्वच्छता झाली होती.या ठिकाणी जुने जीर्ण झालेले कपडे खाद्यपदार्थ तसेच वेफर्सची रिकामी पाकीट, प्लास्टिकच्या बाटल्या , लहान मुलांचे डायपर, औषधांच्या रिकाम्या बाटल्या गोळ्यांच्या स्ट्रिप्स , इंजेक्शनच्या सिरीज, सलाईनच्या रिकाम्या बाटल्या,यामुळे हा परिसर अस्वच्छ बनला होता.
तसेच मुरगूड तलावाचा ओपन बार झाला की काय ? अशी शंका यावी याला कारण म्हणजे स्वच्छते दरम्यान सापडलेल्या तब्बल अडीचशे दारूच्या बाटल्या. या ठिकाणाहून तब्बल एक टन कचरा गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली.तसेच दारूच्या बाटल्या गोळा करून त्यांचीही योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
सकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत तब्बल चार तास आयटीआय समोरील परिसर तसेच तलावाचा सांडवा परिसर या भागामध्ये स्वच्छता करून संत गाडगेबाबा यांना वेगळ्या पद्धतीने आदरांजली वाहिली काहीच दिवसांमध्ये वळीवाचा पाऊस येण्याची शक्यता असते.
त्यामुळे वादळ निर्माण झाल्यास या ठिकाणचा कचरा तलावाच्या पाण्यामध्ये जाऊन नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागेल.त्यामुळे ही स्वच्छता मोहीम राबवल्याचे तरुणांनी सांगितले यावेळी सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट ,ओंकार पोतदार, के बी पाटील,जगदीश गुरव, सोमनाथ यरनाळकर आदी तरुण उपस्थित होते.