ताज्या बातम्या
सुरूते तंटामुक्त गावसमितीच्या अध्यक्षपदी बाबुराव चौगले यांची निवड

चंदगड : पुंडलिक सुतार
चंदगड तालुका बांधकाम कामगार कल्याणकारी असोसिएशन तडशिनहाळ चे उपाध्यक्ष व शिवसेना शाखा सुरूते चे शाखा प्रमुख बाबू गणपती चौगले यांची सुरूते गावच्या तंटामुक्त अध्यक्ष पदी निवड झाले बद्दल कामगार सेना चंदगड, व बांधकाम कामगार कल्याणकारी असोसिएशन तडशिनहाळ च्या वतीने त्यांचा सत्कार करताना कामगार सेना अध्यक्ष कलाप्पा निवगीरे,सचिव मोहन चौगले, खजिनदार उमाजी पवार, विभाग प्रमुख मारूती पाथरूट, संतोष कदम,बाळू कडोलकर, विलास कांबळे, अशोक कांबळे, रघुनाथ पाटील उपस्थित होते. आभार मोहन चौगले यांनी मानले.