ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगुडची जान्हवी सावर्डेकर राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत एक रौप्य तर दोन कांस्यपदकाची मानकरी

मुरगूड : विजय मोरबाळे

मुरगुड येथील कु . जान्हवी जगदीश सावर्डेकर हिने
गाझीपूर (उत्तर प्रदेश )येथे दि. १७ ते २१ मार्च दरम्यान पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल पॉवरलिफ्टींग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत ७२ किलो वजनी गटात एक रौप्य व दोन कांस्यपदके पटकावली आहेत .
गाझीपूर (उत्तर प्रदेश) येथे सुरु असलेल्या नॅशनल पॉवरलिफ्टींग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुरगूडच्या कु.जान्हवी जगदीश सावर्डेकर हिने ७२ किलो वजनी गटात बेंच प्रकारात १०५ किलो वजन उचलुन रौप्य पदक पटकावले . तर स्कॉट प्रकारात १८० किलो वजन उचलल्यामुळे कांस्यपदक तर बेंच -१०५ किलो,स्कॉट प्रकारात १८० किलो व डेड प्रकारात १६७ : ५ किलो असे ४५२.५ किलो वजन उचलल्यामुळे तिन्ही प्रकारातील कामगिरीबद्दल कास्यपदक मिळाले आहे . त्यामुळे जान्हवीला या स्पर्धत एक रौप्य व दोन कांस्यपदके मिळाली आहेत .
यापूर्वी छावणी,औरंगाबाद येथे झालेल्या
महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धत ज्युनियर गटात गोल्ड मेडल तर सिनीयर गटात सिल्व्हर मेडल पटकावले . अखिल भारतीय आंतरविद्यापीठ पॉवरलिफ्टींग अजिंक्यपद स्पर्धत ७९ किलो वजन गटात रौप्यपदकासह राष्ट्रीय व राज्य स्पर्धत ७ सुवर्ण, ५ रौप्य व २ कांस्यपदके पटकावली आहेत . तिला प्रशिक्षक विजय कांबळे,
शिवछत्रपती पुरस्कार विजेते बिभीषण पाटील, वडील जगदीश सावर्डेकर, सोनल सावंत व , लिफ्टर्स पॉइंट जिम कळंबा यांचे मार्गदर्शन लाभले .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks