सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा उत्साहात संपन्न

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगुड येते राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. सदर स्पर्धेमध्ये सहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता मयुरी मानसिंग पाटील (प्रथम क्रमांक ) पूजा प्रकाश मोरे ( द्वितीय क्रमांक ) शुभम बाबू अस्वले( तृतीय क्रमांक ) व सुमित जोतीराम कुंभार उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केले
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ. टी .एम .पाटील होते ते म्हणाले विद्यार्थ्यांच्या मध्ये भारतीय स्वातंत्र्य विषयी जाणीव व जागृती निर्माण करण्यासाठी देशभक्तीपर गीत गायन कार्यक्रम उपयुक्त ठरेल त्यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी डॉ .एम . ए. कोळी यांनी केले प्रास्ताविक डॉ. ए. डी. जोशी तर कार्यक्रमाचे आभार प्रा. एम. आर.बेनके यांनी केले सदर कार्यक्रमाचे तज्ञ परीक्षक म्हणून प्रा. डी . ए. सरदेसाई व ग्रंथपाल तानाजी सातपुते यांनी केले.