ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी नावीन्यपूर्ण संकल्पना मांडण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी राजर्षी शाहू कृषी प्रदर्शन चे आयोजन : राजे समरजितसिंह घाटगे ; सोमवार पर्यंत चालणाऱ्या प्रदर्शनात दीडशेहून अधिक कृषी उपयुक्त स्टॉल

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

शेतकऱ्यांसाठी नावीन्यपूर्ण संकल्पना मांडण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी राजर्षी शाहू कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
कागल येथे राजे फाउंडेशन, शाहू ग्रुप व तिरुमला ऑइल यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त कारखाना शिक्षण संकुल येथील मैदानावर आयोजित राजर्षी शाहू कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनवेळी ते बोलत होते.

यावेळी स्टार्ट अप इंडियाच्या धर्तीवर आधारित स्टार्टअप कोल्हापूर संकल्पनेचे अनावरण झाले. राजे विक्रमसिंह घाटगे अकॅडमी व राजमाता जिजाऊ महिला समिती संचलित सुवर्ण सुगरण ब्रँडचे उद्घाटनही झाले.

यावेळी महाराष्ट्र केसरी विजेता पै पृथ्वीराज पाटील याला शाहू ग्रुप मार्फत पन्नास हजार रुपये रोख प्रोत्साहनपर बक्षीस देऊन गौरव केला. तसेच दिव्यांग पॉवरलिफ्टर शुक्ला बिडकर यांचाही सत्कार केला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या कागलमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या पुतळ्यासाठी २ लाख ८० हजार रुपयांची देणगी श्री घाटगे यांच्या हस्ते सकल मराठा समाजाकडे हस्ते सुपूर्द केली.

सोमवार (त.२५)पर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे. या प्रदर्शनात कृषि विषयी उपयुक्त दीडशेहून अधिक स्टॉल लावले आहेत. तसेच जातीवंत जनावरांचे प्रदर्शन भरवले आहे. यामध्ये दीड टन वजनाचा रेडा हे खास आकर्षण आहे.

श्री घाटगे पुढे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानमध्ये तोफा वितळवून शेतकऱ्यांसाठी नांगर तयार करून आधुनिकीकरणाचा पाया घातला. हाच वारसा शाहू ग्रुपच्या माध्यमातून स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी चालविला. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने प्रयोगशील युवकांनी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढीसाठी नावीन्यपूर्ण संकल्पना मांडाव्यात. त्यापैकी टॉप दहा संकल्पनांना शाहू ग्रुप सर्व प्रकारचे पाठबळ देईल.

व्यासपीठावर राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ नवोदिता घाटगे,
शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील,सर्व संचालक, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण,राजे बँकेचे चेअरमन एम. पी .पाटील, शाहू ग्रुप मधील विविध संस्थांचे पदाधिकारी बाबासाहेब पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.यावेळी तिरूमला ऑइल्सचे मॅनेजर संदीप पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

स्वागत दीपक मगर यांनी केले. आभार दिगंबर अस्वले यांनी मानले.

शाहू मार्फत शेतकऱ्यांना आर्थिक नियोजनाच्या मॉडेलचे प्रशिक्षण…

श्री घाटगे यांनी शेतीला भविष्य व भवितव्य आहे. मोठ्या संख्येने असलेले शेतकरी वर्गास आर्थिक नियोजनाबाबत माहिती देण्यासाठी शाहू साखर कारखान्यामार्फत आर्थिक नियोजनाचे मॉडेल प्रशिक्षण देण्यात येईल. त्यामध्ये पीक पद्धती,मशागत, खत व्यवस्थापन यासाठीचे आर्थिक नियोजन कसे करावे. यासाठी प्रशिक्षण देऊ. शाहू ग्रुप अशा युवकांच्या पाठीशी खंबीरपणे राहील.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks