रात्री – मध्यरात्री अर्धवट जळालेल्या प्रेतांना अग्नी देण्याचा पुण्यरूपी छंद महे गावच्या सागर माने या तरुणांने जोपासला

सावरवाडी प्रतिनिधी :
ग्रामीण समाजात कांही तरुण हे ध्येयवादी असतात . जीवनात कांहीतरी वेगळे करुन दाखविण्याची धाडसी धमक त्यांच्यात असते . स्मशानभुमी म्हटले की माणसं घाबरतात .मयत व्यक्तीला स्मशानभूमीत अंतविधीसाठी सारेजण जमतात . अग्नीसंस्कार केल्यानंतर अर्धवट अवस्थेत जळालेल्या प्रेतांना पुन्हा अग्नी देण्याचा पुण्यरूपी छंद करवीर तालुक्यातील महे गावातील युवक सागर माने यांनी जोपासला आहे . या छंदातून मानुष्कीचे दर्शन घडले जाते.
पावसाळा , हिवाळा उन्हाळा या तीन्ही ऋतूमध्ये स्मशानभुमीत रात्री – अपरात्री प्रेत अर्धवट जळलेल्या अवस्थेमध्ये असतांना पुन्हा सरणामध्ये लाकडे टाकून जाळण्याचे पुण्य काम सागर माने करीत असतात . कशाची भिती न बाळगता ते हे काम आवडीने करतात . महे गावातील रहिवाशी असुन सागर माने हे सर्पमित्रही आहेत . त्यांच्या या धाडसी वृत्तीचे ग्रामस्थ वर्गात कौतुक होत आहे.
माने यांनी आतापर्यत अर्धवट अवस्थेत जळालेल्या प्रेतांना अग्नी देण्याचे निःस्वार्थपणे करतात त्यामुळे त्यांचे ग्रामस्थ वर्गात समाधान व्यक्त होत आहे . दोन हजार जीवंत सापांना पकडून त्यांना जंगलात सोडण्याचे काम ही सागर माने करतात त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होऊ लागले आहे.