जीवनमंत्रताज्या बातम्या
न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून प्रतिक कांबळे याला परदेशी शिक्षणासाठी पाच हजार रुपयांची मदत.

कागल :
कुरुकली ता.कागल येथील प्रतिक कांबळे याला परदेशी शिक्षणासाठीची ७७ लाखाची राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती मिळाली असून त्याला विमान प्रवासा साठी म्हणून न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल च्या विद्यार्थ्यांनी पाच हजार रुपयांची मदत केली .
शाळे मार्फत त्याचा सत्कार करण्यात आला .सत्काराला उत्तर देतांना प्रतिक भावुक झाला .
मला मिळालेली ही मदत बहुमोल आहे पण मुलांच्या शुभेच्छा व शिक्षकांचे आशीर्वाद त्याहून अधिक मोलाचे आहेत .थोर शास्त्रज्ञ डॉ.अब्दुल कलाम यांचा आदर्श आपल्या समोर आहे असे त्याने सांगितले .
ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा विद्यपीठात तो उच्च शिक्षणासाठी जात आहे .
सोशल मिडिया व वृत्तपत्रातील आवाहनास प्रतिसाद देऊन विदयार्थी व शिक्षकांनी प्रतिकसाठी ही मदत जमवली होती .सौ.जसमीन जमादार यांनी प्रास्तविक केले व सौ .सविता पोवार यांनी आभार मानले.