#CRICKET #INDvsPAK : पाकिस्तानसोबत पुन्हा क्रिकेट सुरू होणार!

NIKAL WEB TEAM :
दहशतवादाच्या मुद्द्यावर दोन्ही देशातील संबंध बिघडले आहेत. त्यामुळेच जवळ जवळ १० वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामने झाले नाहीत. या दोन्ही देशात २००७ साली अखेरची द्विपक्षीय मालिका झाली होती.
तेव्हा पाकिस्तानने पाच वनडे आणि तीन कसोटी मालिका खेळण्यासाठी भारत दौरा केला होता. पण २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संबंध बिघडले.
त्यानंतर पाकिस्तान संघ २०१२-१३ साली मर्यादित षटकाची छोटी मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला होता. पण दहशतवादी हल्ल्याने संबंध पुन्हा बिघडले.
आता पुन्हा एकदा दोन्ही देशातील क्रिकेट सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी अनुकुल वातावरण तयार होत आहे. पाकिस्तानमधील एका वृत्तपत्राने केलेल्या दाव्यानुसार या दोन्ही देशात पुन्हा एकदा क्रिकेट सुरू होऊ शकते.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डा (PCB)ने देशातील सरकारच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा केली आहे. नियोजित योजनेनुसार जर सर्व काही ठीक झाले तर या वर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका होऊ शकते.