ताज्या बातम्या

गडहिंग्लज मधील नेताजी पालकर व्यायाम शाळा मध्ये आरोग्यविषयक उपक्रम राबवून हनुमान जयंती साजरी

गडहिंग्लज प्रतिनिधी:(सोहेल मकानदार) 

नेताजी पालकर व्यायाम शाळा आणि त्या भोवतालच्या संपूर्ण परिसरामध्ये नेताजी पालकर व्यायाम शाळेच्या कार्यकर्त्यांनी जो स्तुत्य उपक्रम राबविला, त्याच पद्धतीचे आरोग्यविषयक उपक्रम राबवून जर गडहिंग्लज करांनी नगरपालिका आणि आरोग्य विभागाला सहकार्य केले तर नक्कीच कोरोनाच्या लाटेवर वर आपण लवकरच मात करू शकतो अशी मला आशा आहे” असे उद्गार गडहिंग्लज आरोग्य विभागाचे प्रमुख लक्ष्मण राठोड यांनी काढले.नेताजी पालकर व्यायामशाळेच्या कार्यकर्त्यांनी हनुमान जयंतीचे औचित्य साधून व्यायाम शाळा व व्यायाम शाळेच्या सभोवतालचा परिसराची स्वच्छता करून तेथे औषधांची आणि सॅनिटायझर ची फवारणी केली त्यावेळी ते बोलत होते.हनुमान या शक्‍तीचा प्रतीक असणाऱ्या देवतेच्या जयंती निमित्ताने नेताजी पालकर व्यायामशाळा दरवर्षी वेगवेगळ्या स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करीत असते. कोरोनाच्या संकटामध्ये कोणत्याही स्पर्धांचे किंवा कार्यक्रमांचे आयोजन न करता आसपासच्या संपूर्ण परिसराची स्वच्छता करून व्यायाम शाळेच्या कार्यकर्त्यांनी औषधाची फवारणी केली आणि एक आगळा-वेगळा उपक्रम साजरा करून लोकांमध्ये आरोग्यविषयक जागृतीची मोहीम राबविली. गडहिंग्लज नगरपालिका आरोग्य विभागाचे प्रमुख राठोड यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी रियाजभाई शमनजी , लक्ष्मण कंग्राळकर, सुनील कलाल, संदीप रोटे, संतोष चौगुले, अक्षय सुतार, चेतन कातकर, शरद आसबे, आकाश मोहिते उर्फ गोपी, पृथ्वीराज नेताजी पालकर, तेजस भानसे, निखिल पवार, सचिन कांबळे, भैरु बारामती, राहुल खोत, दिनेश कुंभीरकर, अमर खोत, दिलावर अत्तार, विनायक शेटके यांसह व्यायाम शाळेचे कार्यकर्ते हजर होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks