ताज्या बातम्या
नेसरीत लॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद

नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन सुरु आहे नेसरीकरांनी याला चांगला प्रतिसाद दिला असून फक्त दवाखाने व मेडिकल सुरु असलेने रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत विनाकारण ये जा करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करीत आहेत दूध संस्थांतून दूध संकलन सुरु असून दूध विक्री गर्दी टाळणेसाठी बंद केली आहे सपोनी अविनाश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे कोरोना प्रसार होऊ नये यासाठी सर्व नागरिकांनी नियम पाळावेत असे आवाहन पोलीस करीत आहेत