ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

मराठा आरक्षणासाठी नारायण राणेंची समिती नेमून चूक केली, हसन मुश्रीफांचे मोठे वक्तव्य

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

खासदार संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वात कोल्हापुरात मराठा मूक मोर्चा सुरू झाला आहे. या आंदोलनाला कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट दिली. यावेळी आंदोलकांना मराठा आरक्षणानाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करत हसन मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीची चूक झाल्याचे मान्य केले. सर्वात प्रथम मराठा आरक्षण पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात आघाडी सरकारने दिलं. त्यावेळी नारायण राणे समिती नेमून मराठा आरक्षण देण्यात आलं. पण त्यावेळी आमच्याकडून जी चूक झाली, तीच चूक भाजप सरकारकडूनही झाली. आयोग न नेमता आम्ही समिती नेमून आरक्षण दिलं ही आमची चूक होती, त्यामुळेच हायकोर्टाने आरक्षण रद्द केले, असं म्हणत त्यांनी जाहीर कबुली दिली.

हसन मुश्रीफ म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांची ही पुण्यभूमी आहे. जगाला समतेचा संदेश शाहू महाराजांनी दिला. रयतेसाठी खजिना रिकामा करणारे शाहू महाराज होते. मराठा समाज फक्त राजकीय आरक्षण मागत नाही. आम्ही जी चूक केली..तीच चूक युती सरकारनेही केली. आयोग न नेमता समिती नेमून आरक्षण दिलं.

यावेळी हसन मुश्रीफांनी मराठा आरक्षणावरुन भाजपला राजकारण न करण्याचा सल्ला दिला. भाजपला हात जोडून विनंती, राजकारण करु नका, मराठा आरक्षण टिकलं नाही म्हणता, पण कायदा नीट केला असता तर टिकला असता तर आरक्षण कायम राहिले असते. त्यामुळे आता एकमेकांच्या चुकांकडे बोट न दाखवता मराठा समाजाच्या मागण्या कशा पूर्ण करता येतील यावर लक्ष केंद्रीत करु, असे आवाहन केले.

मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक भूमिका घेत आहे. सर्व विषय पूर्ण केल्याशिवाय शासनाला स्वस्थ बसू देणार नाही. मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी वेळ द्या, हे सर्व प्रश्न सोडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी कालच या मुद्द्यावर चर्चा केली. त्यांनी चर्चेसाठी कधीही तयार असल्याचं म्हटलं आहे. मराठा समाजाने संयम दाखवला आहे. या समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय सरकारला आम्ही स्वतः स्वस्थ बसू देणार नाही, त्यासाठी वाटेल ती किंमत त्यासाठी मोजू, अशी ग्वाही हसन मुश्रीफ यांनी दिली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks