ताज्या बातम्याराजकीय
नाणार प्रकल्प : राज ठाकरेंच्या भूमिकेला शरद पवारांचा पाठिंबा

टीम ऑनलाईन :
नाणार प्रकल्पाबाबत मांडलेल्या भूमिकेला शरद पवारांचा पाठिंबा आहे असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. नाणार प्रकल्प हातचा जाता कामा नये ही भूमिका मांडणारं पत्र राज ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार या दोघांनाही पाठवलं आहे. शरद पवारांनी आपल्याला फोन करून भूमिका योग्य असल्याचं म्हटलंय असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे.
आज राज ठाकरे यांची नाणारवासियांनी भेट घेतली.
या भेटीत नाणारवासियांसमोर राज ठाकरे यांनी हा दावा केला. शरद पवार मुख्यमंत्र्यांशी भेट घेणार आहेत असं राज ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला भेटीचा वेळ दिला नाही तरी शरद पवारांना नक्की भेटीचा वेळ देतील असा टोला राज यांनी मारला.