मुरगूडचा ६ एप्रिल रोजीचा आठवडी बाजार पुढील आदेशापर्यंत बंद

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
राज्यात सुरू असलेल्या संसर्गजन्य कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेता तसेच जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुरगुड येथे भरत असलेला मंगळवार दि- ६ एप्रिल २०२१ रोजी होणारा आठवडी बाजार व जनावारांचा बाजार जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पुढील आदेश येईपर्यंत आठवडी बाजार रद्द केल्याची माहिती मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी दिली आहे .
या कालावधीत जमावबंदी आदेशानुसार कोरोनाचा धोका संभवु नये ,व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या आदेशाने मुरगुड चा आठवडी बाजार रद्द केलेला आहे.
त्यानुसार मंगळवार दि. ६ एप्रिल २०२१ रोजी होणारा आठवडा बाजार आणि जनावर बाजार पुढील आदेश येईपर्यंत भरणार नाही.तरी सर्व नागरिक,भाजीपाला विक्रेते तसेच व्यापारी यांनी याची नोंद घ्यावी .तसेच प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मुरगूड नगरपरिषद व पोलीस प्रशासन यांच्यामार्फत करण्यात आले आहे .