क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुरगूडच्या नेहा चौगलेची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
बुडापेस्ट (हंगेरी) या देशात होणाऱ्या सबज्युनिअर (कॅडेट) जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी लोकनेते सदाशिवराव मंडलिक कुस्ती संकुलची कुस्तीगीर कु. नेहा चोगले हिची ४९ किलो वजन गटातून निवड झाली आहे.
आज (दि२१ रोजी ) दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड चाचणी झाली. यात मुरगूडच्या लोकनेते सदाशिवराव मंडलिक कुस्ती संकुलच्या नेहा चौगलेने पंजाबच्या मनमित व हरयाणाच्या आरतीला पराभूत करीत आपली पात्रता सिध्द केली
कु. नेहाला आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक दादासो लवटे मुरगूड माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर, दयानंद खतकर सागर देसाई यांच्याकडून मार्गदर्शन मिळत आहे तर खासदार संजय मंडलिक, विरेंद्र मंडलिक व राज्य समन्वयक चंद्रकांत चव्हाण यांचे प्रोत्साहन मिळत आहे .