मुरगूड शहरात झालेल्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस गस्त वाढवण्याची मागणी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड शहरात झालेल्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर बाहेरून येणारे फेरीवाले आणि फिरून व्यवसाय करणारे यांची नोंदणी ठेवावी. तसेच पोलिसांनी शहरात गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरामध्ये सध्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर काही भंगार व्यवसायिक, छोटे-मोठे साहित्य विक्रेते, केस गोळा करणारे फेरीवाले गल्लीमध्ये फिरत असतात. त्यांची कुणाकडेच नोंद नसते. त्यामुळे त्यांची नोंद करणे आणि त्यांच्या ओळखपत्राची पडताळणी करणे आवश्यक येणाऱ्या फेरीवाल्यांच्या हालचाली संशयास्पद वाटतात. त्यामुळे त्यांची नोंद मुरगूड पोलीस ठाण्याकडे असावी, तसेच त्यांचा ओळखीचा पुरावा तपासणे गरजेचे आहे. याशिवाय शहरामध्ये पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणीही केली आहे.
यावेळी प्रा. संभाजीराव आंगज, सुनील मंडलिक, सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, विनायक मुसळे, तानाजी भराडे, समीर हळदकर, जावेद मकानदार, प्रफुल्ल कांबळे, रघुनाथ बोडके, जगदीश गुरव, विशाल भोपळे, विनायक मेटकर, संकेत शहा, प्रकाश पारिश्वाड, जितेंद्र मिठारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.