मुरगुड येथील ग्रामीण रुग्णालयास दोन आर ओ प्लॅन्ट प्रदान मुलांच्या वाढदिवसाच्या खर्चाचा केला समाजासाठी उपयोग

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
नेहा एजन्सी व निशांत ट्रेंड्स मुरगुड चे उद्योगपती मोहन गुजर यांनी आपला मुलगा निशांत यांच्या वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करुन मुरगुड येथील ग्रामीण रुग्णालयास सुमारे पन्नास हजार रुपये किंमतीचे दोन आर ओ प्लॅन्ट प्रदान करण्याचा सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबवला.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या आर.ओ.प्लॅन्ट चे वितरण मुरगुड विद्यालय ज्युनिअर कॉलेज चे उपप्राचार्य एस.पी.पाटील यांच्या हस्ते मुरगुड चे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमार ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल पाटील यांच्या कडे प्रदान केले. यावेळी पोलिस हेड काॅंन्स्टेबल महादेव चव्हाण,कोविड वैद्यकीय अधिकारी डॉ.आसवले,जेष्ठ पत्रकार प्रकाश तिराळे, पत्रकार समिर कटके, संदिप सुर्यवंशी, अधिपरीचारीका श्रीमती जे.एस.शिंदे, कार्यालयीन कर्मचारी सर्जेराव कदम, होमगार्ड सर्जेराव भारमल, सुरक्षारक्षक रवि लोकरे,आर.डी.चव्हाण रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित.आपल्या मुलग्या च्या वाढदिवसाच्या औचित्य साधून
रुग्णालयास फिल्टर पाणी उपलब्ध करून दिले बद्दल डॉ .अमोल पाटील यांनी मोहन गुजर यांचे आभार मानले.एक मिनाटात पन्नास लिटर पाणी देणारे हे दोन प्लॅन्ट कोविड काळात रुग्णांना शुद्ध व मुबलक पाणी मिळावे या हेतूने देण्यात आले असून येथुन पुढे कायमस्वरूपी देखभाल खर्च ही करणार असल्याचे मोहन गुजर यांनी सांगितले.