मुरगुड पोलिसांची धडक कारवाई ; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर दंडात्मक कार्यवाही,मॉर्निग वॉक पडले महागात…

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुडमध्ये मुरगुड पोलिस प्रशासनाने धडक कार्यवाही ला सुरुवात केली आहे यामध्ये कडकडीत लॉकडाऊन काळात विनामास्क फिरणे चोरून दुकान सुरु करणे, मॉर्निंग वॉक ला जाणे व विनाकारण मोटरसायकलवरून फिरणाऱ्यावर मुरगूड पोलिसांनी कारवाई करून १७ हजाराचा दंड वसूल केला आहे.
मुरगूड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावामधून विनामास्क ५३ जणांच्या कडून ५३०० रुपये, चोरून दुकान उघडणाऱ्या ८ जणाकडून ४२०० रुपये, मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या १० जणाकडून ५००० रुपये विनाकारण मोटरसायकल वरून फिरणाऱ्या १२ जणाकडून २४०० रूपये असा एकूण १७ हजाराचा दंड मुरगूड पोलीसांनी वसूल केला आहे या कारवाई वेळी ७ मोटरसायकली ही जप्त केल्या आहेत. या कारवाई मध्ये एपीआय विकास बडवे, पोलीस उपनिरीक्षक किशोरकुमार खाडे, कुमार ढेरे, कॉन्स्टेबल स्वप्नील मोरे व अन्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.