मुरगुड – पंढरपूर , मुरगुड – कोल्हापूर नवीन बसचा शुभारंभ

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड ते पंढरपूर व मुरगूड ते कोल्हापूर ( रातराणी सह) मार्गासाठी मुरगूड बस स्थानकाला दोन नवीन बस प्राप्त झाल्या आहेत. त्यांचा शुभारंभ मुरगुड मधील व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आला. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.प्रकाश आबिटकर यांच्या सहकार्याने आणि अभिजीत भोसले, जनसंपर्क अधिकारी परिवहन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या विशेष प्रयत्नातून या बस मुरगूड शहरास प्राप्त झाल्या आहेत .
प्रतिष्ठित व्यापारी शशिकांत दरेकर आणि पत्रकार ओंकार पोतदार यांचे हस्ते दोन्ही बसचे पूजन ,तर प्रगतिशील कापड व्यापारी प्रशांत शहा आणि लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे संचालक दत्तात्रय तांबट यांच्या हस्ते फित कापून या बसचा शुभारंभ करण्यात आला.
मुरगुड बस स्थानकास लॉन ,नाना नानी पार्क या सारख्या आवशक त्या सुविधांसाठी व्यापाऱ्यांच्या तथा उद्योजक व व्यावसायिकांच्या माध्यमातून सहकार्य करू असे आश्वासन प्रशांत शहा यांनी आपल्या मनोगतातून दिले. मुरगूड बस स्थानक व नगरपालिके समोरील शिवतीर्थ ही शहराची सौंदर्यस्थळे आहेत असे त्यांनी नमूद केले.मुरगुडचे नागरिक त्यांची निश्चित चांगली जोपासना करतील असेही त्यांनी आश्वस्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत यशवंत पाटील वाहतूक नियंत्रक यांनी केले तर आभार अभिजीत चौगुले आगार व्यवस्थापक गारगोटी यांनी मानले .यावेळी राज्य परिवहन चे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले, सहायक जनसंपर्क अधिकारी रोहन देसाई, सहाय्यक वाहतूक अधिक्षक सागर पाटील, प्राचार्य व्हि.आर .भोसले, वाहतूक नियंत्रक शशिकांत लिमकर, वाहतूक नियंत्रक दिलीप घाटगे , नूतन पंढरपूर बसचे चालक वाहक संदीप पाटील यांच्यासह प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.