40 टक्के अपंगत्व असलेल्या लाभार्थ्यांसाठी समाज कल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण विभागामार्फत पंचायत राज संस्थांनी त्यांच्या स्वउत्पन्नातून 5 टक्के निधीतून घ्यावयाच्या अपंग कल्याणासाठी योजना व खर्चाबाबत वैयक्तिक लाभाच्या योजना समाज कल्याण कार्यालयामार्फत कार्यान्वित आहेत. सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये किमान 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या पात्र लाभार्थ्यास या योजनेमार्फत खालीलप्रमाणे अर्थसहाय्य दिले जाते.
अ.नं. योजनेचे नांव अटी व शर्ती
1. अपंग-अपंग व्यक्तीना विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान देणे .
अनुदान रक्कम रुपये- 50 हजार रु.
(अक्षरी रुपये – पन्नास हजार ) फक्त 1. अर्जदार वधू व वर यांचे किमान 40 टक्के अपंगत्व असल्याबाबतचे जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र
2. विवाह नोंदणी दाखला आवश्यक.
3. वध व वराचे एकत्रीत फोटो.
4. दोन प्रतिष्ठीत व्यक्तीची शिफारस पत्रे .
5.महाराष्ट्राचे रहिवासी असल्याबाबत अधिवास (डोमासिल्ड )
प्रमाणपत्र (अर्जदार हा कोल्हापूर जिल्हयातील ग्रामीण भागातील
रहिवासी असावा.)
6. बँक पासबुक (संयुक्त खाते )
7. आधार कार्ड झेरॉक्स .
8. विहित नमुना प्रतिज्ञापत्र रुपये – 100/- च्या स्टॅप्मपेपर वर
आवश्यक.
9. जन्म नोंद दाखला/शाळा सोडलेचा दाखला.
10.अर्जदार यांनी आपले विहित नमुन्यामध्ये परिपूर्ण कागदपत्रासह
आपल्या तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये सादर करायचे आहेत.
2. राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेसाठी निवड होऊन सहभाग घेतलेल्या तसेच राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या जिल्हयातील अपंग खेळाडूंना अर्थसहाय्य .
योजनेचे स्वरुप –
1.आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी
झालेल्या खेळाडूस एकरक्कमी
रुपये – 75 हजार रु.
2. .राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी
झालेल्या खेळाडूस एकरक्कमी रुपये- 50 हजार रु.
3. राज्यस्तरावरील स्पर्धेमध्ये प्रथम ,व्दितिय व तृतिय क्रंमाक मिळविणाऱ्या खेळाडूस एकरक्कमी रुपये – 25 हजार रु.
1. अर्जदाराचे किमान 40 टक्के अपंगत्च असल्याबाबतचे जिल्हा
शल्य चिकित्सक यांचे वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र.
2. अर्जदार हा द्रारिद्रय रेषेखालील कुटूंबातील सदस्य असल्याचा
ग्रामसेवकाने दिलेला दाखला (लागू असल्यास).
3. अर्जदाराने आंतरराष्ट्रीय /राष्ट्रीय/राज्यस्तरीय स्पर्धेत क्रमांक
मिळविल्याचे वा घेतल्याचे प्रमाणपत्र.
4. तहसिलदार यांनी दिलेल्या मागील वर्षातील रुपये – 1,00,000/-
च्या आतील उतपन्नाचा दाखला .
5.महाराष्ट्राचे रहिवासी असल्याबाबत अधिवास (डोमासिल्ड )
प्रमाणपत्र. (अर्जदार हा कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील
रहिवासी असावा.)
6. अर्जदार ग्रामपंचायतीच्या बँक खाते पासबुकाची सत्यप्रत .
7. आधार कार्ड झेरॉक्स.
8.संबंधित लाभार्थ्याने सन 2019-20 व सन 2020-21 मध्ये
आंतरराष्ट्रीय/ राष्ट्रीय/राज्यस्तरावर स्पर्धेत भाग घेतलेला असावा
व या वर्षात या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
9. आंतरराष्ट्रीय/ राष्ट्रीय/राज्यस्तरावर स्पर्धेत भाग घेतलेला खेळाडू
या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असल्याबाबत जिल्हा क्रीडा
अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक.
10.राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम,व्दितिय व तृतिय क्रंमाक मिळविलेले
खेळाडू या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील.
11. योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र खेळाडूंची संख्या जास्त
असल्यास आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूना प्राधान्य
देण्यात येईल.
12. अर्जदार यांनी आपले विहित नमुन्यामध्ये परिपूर्ण कागदपत्रासह
आपल्या तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये सादर करण्याचे
आहेत.
या योजनांचा लाभ जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जास्तीत-जास्त पात्र अपंग व्यक्तींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे.