मुरगूडमध्ये क्रांतिदिनी हुतात्म्यांना अभिवादन

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड ता.कागल येथे नगरपालिका व समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली. येथील हुतात्मा तुकाराम चौकातील हुतात्मा तुकाराम भारमल यांच्या पुतळ्यास मुरगूड नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप घार्गे यांनी हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी पालिका कार्यालय अधीक्षका स्नेहल पाटील, अभियंता प्रकाश पोतदार, जयवंत गोधडे, रणजित निंबाळकर, सुभाष अनावकर, अमर कांबळे,अनिकेत सुर्यवंशी ,सुनील पाटील आदींसह पालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने क्रांतिदिनी हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. एल. एस. गोधडे यांच्या हस्ते हुतात्मा तुकाराम भारमल यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी कॉ. बबन बारदेस्कर, मोहन कांबळे, प्रदीप वर्णे, भिकाजी कांबळे, रणजित कदम उपस्थित होते.