ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांचा ५० वा वाढदिवस उत्साहात साजरा ; विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगूडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या ५० वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वाढदिवसानिमित्त राजकिय , सामाजिक . शैक्षणिक . सांस्कृतिक कला अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला .
खासदार संजय मंडलिक यांनी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांना शुभेच्छा देवून त्यांचा सत्कार केला . यावेळी बोलताना खासदार मंडलिक म्हणाले , राजेखान जमादार यांनी नगराध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे . अशा कार्यकर्त्याची .समाजाला खरी गरज आहे . त्यांनी यापुढेही चांगले कार्य करत रहावे . तरुणांना रोजगार देण्याचा व सर्वाना विश्वासात घेवून पुढे जाण्याची त्यांची सचोटी अशीच चालू रहावी .
नगराध्यक्ष राजेखान जमादार आपल्या वाढदिवस व सत्कारप्रसंगी म्हणाले , मला राजकारणापेक्षा समाजकारणाची जास्त आवड आहे . सामान्य माणूस माझा केंद्रबिंदू आहे . त्यांच्या कल्याणासाठी येथून पुढेही कार्यरत राहीन .
वाढदिवसानिमित ग्रामविकास मंत्री ना .हसन मुश्रीफ , पालकमंत्री ना सतेज पाटील . भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे , माजी आमदार संजय घाटगे मंडलिक युवा प्रतिष्ठानचे अॅड विरेंद्र मंडलिक,बिद्रीचे चेअरमन के पी पाटील . कॉंग्रेसचे सरचिटणीस अॅड सुरेश. कुऱ्हाडे गोकूळचे संचालक अमरिशसिंह घाटगे , विश्वास पाटील धीरज डोंगळे , इंद्रजित बोंद्रे ‘ मधुकर रामाणे , शिक्षण सहसंचालक श्री .गोसावी , माजी शिक्षण संचालक महावीर माने , माजी जिल्हाधिकारी डी पी मेतके , जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील , जयवंतराव शिंपी , मुकूंद देसाई नंदकिशोर सुर्यवंशी पनोरीकर ‘आदिंनी राजे खान जमादार यांना शुभेच्छा दिल्या .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks