मुरगूड शहर निसर्ग मित्र मंडळ यांचेकडून निसर्ग २०० वृक्षांना बांधल्या राख्या

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
येथील मुरगूड शहर निसर्ग मित्र मंडळ व महिला निसर्ग मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी प्रमाणे रक्षाबंधन सणाचे औचित्य साधत. वृक्षरक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावर्षी च्या वृक्षरक्षाबंधन कार्यक्रचा शुभारंभ महिला निसर्ग मंडळाच्या अध्यक्षा सौ.निता सुर्यवंशी यांचे हस्ते सरपिराजीरोड वरील वृक्षाला मोठी राखी बांधून करणेत आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ.जनाबाई देवडकर या होत्या.
पर्यावरण संवर्धनाची चळवळ ज्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून मुरगूड परीसरा सह संपूर्ण तालुक्यात कार्यरत असणारे वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी सुरु केलेल्या अनेक उपक्रमापैकी हा एक स्तुत्य उपक्रम असून गेली १९ वर्षे हा वृक्ष रक्षाबंधनाचा उपक्रम सुरु आहे.
आजच्या या कार्यक्रमात सरपिराजी रोड बाजार पेठेतील एकूण २०० वृक्षांना राख्या बांधणेत आल्या.
यावेळी नगरसेविका प्रतिभा सुर्यवंशी, अनिता चव्हाण, कल्पना महेकर, वैशाली सुर्यवंशी, सुप्रिया चव्हाण, निलोफर तासिलदार, आसावरी चव्हाण या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. तसेच वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी, सदाशिव नलगे, शिवाजी कुडवे, अनिल चव्हाण, अक्षय शिंदे, मृत्युंजय सुर्यवंशी, ओंकार कुडवे, सिध्देश सुर्यवंशी, श्रीधर पाटील, वैभव कुडवे आदी उपस्थित होते .