‘माझी माती माझा देश’ अभियाना अंतर्गत मंडलिक महाविद्यालयात पंचप्रण शपथ कार्यक्रम

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
भारताच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त ‘माझी माती, माझा देश’ हे अभियान सर्वत्र राबवले जात आहे. त्यानिमित्ताने सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या वतीने व महाराष्ट्र शासन सांस्कृतिक व पर्यटन विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ९ ऑगस्ट या क्रांतीदिनी पंचप्राण शपथ घेण्यात आली.
१) भारताला २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न साकार करू २) गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू. ३) देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू. ४) भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू. ५) देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू. अशी ही पंचप्राण शपथ सामुहिक रित्या घेण्यात आली. ही सामूहिक शपथ महाविद्यालयाचे उपप्राचार्य व राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.टी.एम.पाटील यांनी सर्वांना दिली. या सामूहिक कार्यक्रमात बोलताना डॉ. टी.एम.पाटील म्हणाले की, यानिमित्ताने सर्वांनी देशसेवेचे व्रत हाती घेतले पाहिजे आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत कार्य केले पाहिजे तरच भारत जागतिक महासत्ता बनेल.
यावेळी प्रास्ताविक प्रा. डॉ. एम. ए. कोळी यांनी केले. तर आभार प्रा. सुशांत पाटील यांनी मानले. यावेळी आर्ट्स फॅकल्टी हेड प्रा. पांडुरंग सारंग, प्रा.डॉ.ए. डी.जोशी, प्रा. डॉ. शिवाजी होडगे, प्रा. डॉ. एच. एम. सोहनी, प्रा. डॉ. एस. बी. पोवार, प्रा. डी. पी. साळुंखे, प्रा. एस. ए. दिवाण, प्रा. व्ही. ए. कांबळे, प्रा. डी. ए. सरदेसाई, प्रा. एम. आर. बेनके, प्रा. डी. व्ही. गोरे, प्रा. संजय हेरवाडे, प्रा. तृप्ती गवाणकर, प्रा. रामचंद्र पाटील, प्रा. गुरुनाथ सामंत, प्रा. कुचेकर व प्रशासकीय सेवक तसेच बहुसंख्येने विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.