मुरगूड येथे रॅपिड अँन्टिजेन टेस्ट सुरू

मुरगुड प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्यात कोविड १९ संसर्गाचा वाढता प्रभाव पाहता कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी तसेच रस्त्यावर विनाकारण फिरणा-या व्यक्तिना अटकाव घालण्यासाठी ग्रामीण रुग्णालय मुरगूड येथे आज रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट सुरू करण्यात आली आज पहिल्या दिवशी ८ लोकांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
सदरची तपासणी इली, सारी चे रुग्ण, गरोदर माता, बाळंतपणासाठी दवाखाण्यात येणा-या स्त्रिया तसेच नगरपरिषद कार्यक्षेत्रात येणारे सुपर स्प्रेडर यांची सकाळी ११ ते ५ या वेळेत ग्रामीण रुग्नालय मुरगूड येथे करण्यात येणार आहे.
सदर तपासणी वेळी डॉ. हर्षला वेदक (निवासी वैद्यकिय अधिकारी बाह्य संपर्क सिपीआर कोल्हापूर) यांनी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी यांना आवश्यक त्या सुचना दिल्या या वेळी मुरगूड्चे नगराध्यक्ष राजेखान जमादार, मुख्याधिकारी संजय गायकवाड, वैद्यकिय अधिक्षक डॉ. बी.डी.डवरी, पोलिस उपनिरीक्षक किशोरकुमार खाडे, दत्तात्रय मंडलिक उपस्थित होते.