मुरगूडच्या अमृता पुजारीला कुस्तीत सुवर्णपदक .

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूडच्या अमृता पुजारीने 20 वर्षाखालील राष्ट्रीय फेडरेशन कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले ,.
रोहतक ,हरियाणा येथे झालेल्या 65 किलो वजन गटात महाराष्ट्राला मिळालेले हे एकमेव सुवर्ण पदक आहे .
अमृताने दुसरी व तिसरी फेरी सहज जिंकली व अंतिम फेरीत हरियाणाच्या आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या तनु ला दुहेरीपट व झोळी इत्यादी डावांचा उपयोग करून ८:६ फरकाने चित केले .तिच्या कारकिर्दीतील हे तिचे पाहिले सुवर्णपदक ठरले .
या शिवाय मुरगूडच्याच नेहा चौगले हिने 50 किलो गटात रौप्यपदक पटकावले .अंतिम फेरीत तिला हरियाणाच्या हनी कुमारी कडून पराभव पत्करावा लागला.तसेच सायली दंडवते हिला76 किलो गटात कांस्य पदक मिळाले.
या तिन्ही मुली येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या (SAI) खेळाडू असून त्यांना आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच दादासो लवटे, वस्ताद सुखदेव येरुडकर (माजी नगराध्यक्ष), दयानंद खतकर व सागर देसाई यांचे मार्गदर्शन लाभले .
कोल्हापुरचे खासदार संजयं मंडलिक ,विरेंद्र मंडलिक ,चंद्रकांत चव्हाण (राज्य समन्वयक ),आण्णा सो थोरवत (सहकार्यवाह),डॉ.प्रशांत अथणी,कोल्हापूर जिल्हा तालीम संघ,मुरगूड नगर परिषद यांचे प्रोत्साहन लाभले .