ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सहकारी संस्थांच्या माध्यमातून मायक्रो एटीएम सुविधांचा बचत गटांनी लाभ घ्यावा : सी. आर. पोवार 

सावरवाडी प्रतिनिधी :

नव्या बदलत्या युगात ग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या आर्थिक उन्नती करिता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सहकारी संस्थातर्फ  सुरू असलेल्या मायक्रो एटीएम सुविधाचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवती सहकारी बँकेचे निरिक्षक सी आर पोवार यांनी केले.

सावरवाडी ( ता . करवीर ) येथील पीएन पाटील विकास सेवा संस्था व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या मायको एटीएम केंद्राच्या आयोजित शुभारंभ प्रसंगी पोवार बोलत होते . अध्यक्षस्थानी माजी सरपंच व कॉग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब खोपकर होते. 

प्रारंभी विविध मान्यवरांच्या हस्ते मायक्रो एटीएम केंद्राचा संस्थेच्या सभागृहात शुभारंभ करण्यात आला . यावेळी संस्थेमार्फत मान्यवर व महिला बचत गटप्रमुखांचा सत्कार करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात बोलतांना काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब खोपकर म्हणाले सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण महिला सक्षम बनल्या पाहिजे . आर्थिक विकासासाठी विविध योजनांचा उपयोग करून घ्यावा. 

यावेळी  बाबुराव नलवडे , सुरेश दिवसे, शिवाजी जाधव , सरदार जाधव ,यशवंत कंदले , शामराव जाधव , उपसरपंच आनंदी नलवडे , राणी दिवसे , आदिची भाषणे झाली . प्रारंभी संस्था सचिव कृष्णात जाधव यांनी प्रास्ताविक केले. शेवटी बाजीराव नलवडे यांनी आभार मानले.

कार्यक्रमास युवा नेते निलेश खोपकर , ईश्वरा नलवडे , रामचंद्र जाधव , सुनिल साळोखे , विष्णूपंत तळेकर , बाळासाहेब दिवसे यांच्यासह ग्रामस्थ व बचत गटाच्या महिला उपस्थितीत होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks