देवमाणूस ही मालिकेतील डॉक्टरला मदत करणारी डिंपल तब्बल सहा वर्षानंतर, ज्योती जेलमधून पडणार बाहेर

झी मराठी वाहिनीवरील देवमाणूस ही मालिका साताऱ्यातील एका सत्यघटनेवर आधारित होती हे सर्वांनाच ठाऊक आहे. नुकतेच देवमाणूस 2 मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या पर्वात नकली डॉक्टर बनलेला अजितकुमार देव अनेकांची फसवणूक करताना दिसला. त्याने महिलांची केवळ फसवणूकच केली नाही तर त्यांना मृत्यूच्या दाढेत ओढलं होतं. मालिकेतून डॉक्टरला फाशी देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात या घटनेशी संबंधित असलेला सीरिअल किलर डॉक्टर सतीश पोळ हा अजूनही कैदेत असून आपली शिक्षा भोगत आहे. सतीश पोळ हा बनावट डॉक्टर असून त्याने तब्बल 36 खून केले असल्याचे कबूल केले आहे. ही घटना 2003 ते 2016 या कालावधीत घडली होती.
मंगल जेधे खून प्रकरणानंतर ह्या घटना हळूहळू उघडकीस आल्या होत्या. 11 ऑगस्ट 2016 साली या घटणेप्रकरणी डॉ सतीश पोळ यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर कोर्टात त्यांच्यावर केस लढवण्यात आली. 2016 पासून सतीश पोळ पोलिसांच्या ताब्यात आहेत. देवमाणूस मालिकेत डॉक्टरांना मदत करणारी डिंपल तुम्ही पाहिली आहे. ती देखील या गुन्ह्यात सामील होती हे मालिकेतून दाखवण्यात आले होते. डॉ सतीश पोळ यांची साथीदार ज्योती मांडरे हिला नुकताच न्यायालयाने एक दिलासा देणारी बातमी दिली आहे. ज्योती मांडरे हिला माफीचा साक्षीदार म्हणून अटक करण्यात आली होती. फार्महाऊसमध्ये मृतदेह पुरलेल्या एका व्यक्तीच्या खुणासंबंधी ज्योतीला अटक करण्यात आली होती. मात्र आता सातारा जिल्हा न्यायालयाने ज्योतीला 1 वर्षासाठी जामीन मंजूर करून दिला आहे. 2016 सालापासून सातारा जिल्हा पोलिसांनी ज्योतीला अटक केली होती. गेल्या सहा वर्षांपासून ती आपली शिक्षा भोगत आहे. मात्र सहा वर्षाच्या कालावधीनंतर ज्योतीला आरोग्याच्या कारणास्तव एक वर्षासाठी जमीन मंजूर करून दिला आहे. आजची हि बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरताना पाहायला मिळत आहे.
त्यामुळे तब्बल सहा वर्षानंतर ज्योती जेलमधून बाहेर पडणार आहे. देवमाणूस या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. ददेवमाणूस बनून डॉक्टर किती तरी जणींना आपल्या जाळ्यात ओढताना पाहायला मिळाला. या कामात त्याला डिंपलची देखील वेळोवेळी मदत मिळाली होती. मात्र अनेक प्रेक्षकांनी या मालिकेवर आक्षेपही घेतलेले पाहायला मिळाले. स्तुती, टीका सहन करत ही मालिका यशाचा एक एक टप्पा पुढे सर करताना दिसली. देवमाणूस 2 मधून मालिकेचा सिकवल देखील समोर आला यात शेवटी डॉक्टरला अटक करण्यात आली आणि त्याला आपल्या कर्माची शिक्षा म्हणून फाशी देण्यात आली. मालिकेत ह्या घडामोडी पटापट घडत असल्या तरी या घटनेला 13 वर्षांचा कालावधी लागला होता मात्र आरोप सिद्ध होऊनही सतीश पोळला सुखरूप कसा याची चिंता सामान्य नागरिकांना आहे.