लक्षतीर्थ वसाहत येथे खुनी हल्ला; हल्ल्याप्रकरणी रिंकू देसाई सह बारा जणांवर लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा दाखल
कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
लक्षतीर्थ वसाहत येथे दोघांचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी रिंकू देसाई सह बारा जणांवर खुनाचा गुन्हा लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन मध्ये दाखल. हा हल्ला राजकीय वर्चस्ववादातून झाल्याची चर्चा लक्षतीर्थ वसाहत आणि फुलेवाडी रिंग रोड येथे चालू आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी संशयित आरोपी रिंकू देसाई याचा सोमवारी वाढदिवस होता वाढदिवसानिमित्त रिंकू देसाई याने संतोष बोडके व कृष्णात बोडेकर यांना फुलेवाडी बोंद्रे नगर रिंगरोड लक्षतीर्थ वसाहत येथे वाढदिवसाचे डिजिटल फलक लावण्यास सांगितले होते. डिजिटल फलक जर लावले नाही तर त्याचे वाईट परिणाम होतील अशी धमकीही रिंकू देसाई यांनी त्यांना दिली होती. पण संतोष बोडके व कृष्णात बोडेकर यांनी वाढदिवसाचे पोस्टर लावले नसल्याच्या रागातून रिंकू देसाई आणि त्याच्या बारा साथीदारांनी लक्षतीर्थ वसाहत येथे सोमवारी रात्री या दोघांना घरातून बोलवून तलवार कोयता लोखंडी गज हानी प्राणघातक शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झालेले आहेत. यामध्ये संतोष बोडके याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कृष्णात बोडेकर याने रिंकू देसाई सह 12 जणां विरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोरांना अटक करण्यासाठी पोलिसांनी मध्यरात्रीही ठीक ठिकाणी छापे टाकले आहेत. मात्र हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले.