मुधाळ : रणजितदादांच्या प्रचारार्थ भुदरगड महाविकासची प्रचारातही आघाडी

भुदरगड प्रतिनिधी :
तालुक्यातील महाविकासआघाडीच्या स्थानिक नेत्यांकडून केडीसी बँकेचे संचालक रणजीतदादा पाटील यांनाच शाहू आघाडीतून उमेदवारी देण्याच्या मागणीवर एकमत झाले असून मतदारसंघातील महाविकास आघाडीचे सर्वच नेते, कार्यकर्त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.मंत्री, नामदार हसनसो मुश्रीफ,माजी आमदार बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के .पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघासह जिल्हा संपर्क प्रचारदौऱ्या निमित्त प्रथम फेरी पूर्ण झाली आहे. अशी माहीती गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार समिती सदस्य, बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक सुनिलराव कांबळे यांनी दिली. राजर्षी शाहू आघाडीला वातावरण अनुकूल असून सर्वच पातळीवर कार्यकर्ते, ठरावधारक गोकूळ मधिल सत्ताबदलाचे संकेत देत आहेत. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर प्रचार यंत्रणेवर मर्यादा येत असून, सोशल मिडीयाच्या माध्यमाचा वापर करून संपर्क वाढविला असल्याची माहीती त्यांनी दिली.
भुदरगड,आजऱ्या पासून ते करवीर, गगनबावडा तालुक्यापर्यंतच्या ग्रामीण भागाचा संपर्क दौरा करून ग्रामीण भागातील सहकारी संस्थांच्या ठराव धारकमतदारांच्या गाठीभेटी घेऊन आमची भूमिका स्पष्ट करत आहोत. गोकूळ दूध संघाच्या माध्यमातून सर्वसामान्य दूध उत्पादकाचे हित जोपासणार आहे असे मत केडीसी बँकेचे संचालक रणजीतदादा पाटील यांनी व्यक्त केले.यावेळीभुदरगड पंचायत समिती माजी सभापती बापूसो आरडे, विश्वनाथ कुंभार, यांच्यासह भुदरगड तालुक्यातील महाआघाडीचे स्थानिक नेते उपस्थित होते .
कोरोनाच्या पाश्र्वभूमिवर सर्व दक्षता घेवूनच प्रचार
उच्च न्यायालयाच्या निकालानुसार आचारसंहिता पाळून प्रचार यंत्रणा राबविण्यासंबधी कोरोनाच्या पाश्र्वभूमिवर सर्व नियम पाळून दक्षता घेवूनच प्रचार केला जात आहे. कोरोनाचे संकट गडद होत असलेने प्रत्यक्ष संपर्क टाळून सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी,सोशल मिडीयाद्वारे ठराव धारक मतदारांच्या संपर्कात राहण्याच्या स्पष्ट सूचना वरीष्ठ नेत्यांनी दिल्या आहेत.