ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुदाळतिट्टा : विनापरवाना कंबरेला गावठी कटटा लावून दशहत माजवत फिरत असलेल्या अल्पवयीन मुलास मुरगुड पोलिसांनी ताब्यात घेतले.

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुदाळ तिट्टा येथे एक अल्पवयीन मुलगा कंबरेला गावठी कटटा लावून दशहत माजवत फिरत असताना मुरगूड पोलीसांनी त्याला पकडले व त्याच्या कडील गावठी कट्टा बंदूक हस्तगत केली आहे.

मुदाळ तिट्टा येथे एक अल्पवयीन मुलगा कंबरेला गावठी कट्टा बांधून दहशत माजवत फिरत असल्याची माहीती गोपनीय बातमीदाराकडून मिळाली होती. त्याअनुषंगाने पोलीस अमंलदार अमर पाटील, रमेश शेंडगे, स्वप्निल मोरे व सचिन निकाडे यांनी मुदाळ तिटा येथे शोध घेतला असता, त्यांना एक मुलगा हा आपले कंबरेला गावठी बनावटीचा कटटा लावून फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्यास ताब्यात घेवून सदरच्या गावठी कठयाबाबत तपास केला असता तो अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर सदर विधीसंघर्षग्रस्त बालकाविरुध्द विनापरवाना बेकायदेशिररीत्या देशी बनावटीचा कटटा जवळ बाळगलेबबदल गुन्हा नोंद करणेत आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रशांत गोजारे हे करत आहेत

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks