सरदार सरावणे फौंडेशन कडून महावितरण अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार

तरसंबळे प्रतिनिधी : शाम चौगले
राधानगरी तालुक्यातील कासारवाडा येथील धोकादायक पोल व विद्युत वाहिन्यांची महावितरण कार्यालय सरवडे यांच्याकडून आज 24 मे रोजी दुरुस्ती केल्याबद्दल सरदार सरावणे फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश पाटील यांच्याकडून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला कासारवाडा येथील पालकरवाडी गल्ली मधील महावितरण च्या पोलच्या दुरवस्थेमुळे पोलवरील वायर खाली लोबंकळत असलेने परिसरातील लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता यासाठी महावितरणकडून योग्य ती उपाययोजना करण्यात यावी या मागणीचे निवेदन सरदार सरदार सरावणे फाऊंडेशनचे अध्यक्ष सतीश पाटील व कार्यकर्त्याकडून महावितरण कार्यालय सरवडे येथे देण्यात आले होते . त्याचबरोबर लवकरात लवकर या ठिकाणच्या या दुरावस्थ पोलचं काम करून संभाव्य धोका टाळावा यासाठी महावितरण अभियंत्यांना विनंतीही करण्यात आली होती त्यानुसार आज महावितरण कार्यालयाकडून संबंधित पोलचे काम करून या ठिकाणच्या लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्या दुरुस्त केल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे याबाबत अध्यक्ष सतीश पाटील सह अन्य कार्यकर्त्याकडून महावितरण कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी तसेच उपस्थित मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपसरपंच सरपंच जयवंत पाडळकर ,अनिल राऊत, तानाजी खोत तानाजी शिंदे ,महावितरण कार्यालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी सह शिवाजी थोरवत, कृष्णात सूर्यवंशी ,आदी उपस्थित होते.