ताज्या बातम्यामहाराष्ट्र
शालेय पोषण आहार मदतनीसांना थकीत मानधन न मिळाल्यास आंदोलन छेडू : जिल्हाध्यक्ष कॉ भगवान पाटील यांचा इशारा .

सावरवाडी प्रतिनिधी :
ग्रामीण भागात शालेय पोषण आहार मदतनीसांना राज्य शासनाने दिलेले मानधन त्वरीत मिळावे अन्यथा संबधित कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाभर आंदोलन छेडू असा इशारा लालबावटा शालेय पोषण आहार मदतनीस संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड भगवान पाटील यांनी दिला .
शालेय पोषण आहार मदतनीस युनियनच्या तालुकास्तरीय मेळाव्यात पाटील बोलत होते . पाटील म्हणाले ग्रामीण भागातील शालेय पोषण आहार . मदतनिशांचे प्रश्न वाढती असुन त्यांना वेळेवर मानधन मिळत नाही . त्यासंबधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्या दिवाळी पूर्वी आंदोलन उभारण्यात येणार आहेत .