ताज्या बातम्या

कोरोना पार्श्वभूमीवर आमदार राजेश पाटील यांचा आढावा दौरा

नेसरी प्रतिनिधी : पुंडलिक सुतार

चंदगड तालुक्यात सुरू असलेल्या कोरोना कम्युनिटी स्प्रेड च्या अंतर्गत चंदगड विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील साहेब यांनी विस्तृत आढावा घेतला कोलिक ,माळुंगे ,तुडिये तसेच शिनोळी याठिकाणी वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन विभागाच्या प्रांत, तहसीलदार, बीडीओ या सर्व प्रशासकीय यंत्रणेला सोबत घेऊन भागाचा दौरा केला.

रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असलेल्या गावातील कोरोना दक्षता कमिट्या एकत्र घेऊन त्या त्या गावातील आरोग्य यंत्रणा तसेच सुरक्षा यंत्रणा वाढवण्या च्या सूचना आमदार साहेबांनी केल्या ,कोरणा दक्षता कमिटी तसेच आशा, आरोग्य सेवक शिक्षक ,यांनी प्रत्येक घरात जाऊन कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग ची जबाबदारी योग्य रितीने पार पाडून सध्या जोरात सुरू असलेली कोरोना ची चेन लवकरात लवकर ब्रेक करण्याचे आवाहन आमदार साहेबांनी केले .आपल्या तालुक्यात कोरोना प्रतिबंध करायचा असेल तर कोरोणा प्रतिबंधक त्रिसूत्रीचा अवलंब आपण नक्की करावा तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी ची जाणीव करुन देण्यास ही ते विसरले नाहीत या दौऱ्यात शासकीय यंत्रणेने सोबत तूर्केवाडी जि प सदस्य अरुण सुतार, माजी सभापती चिगरे साहेब, कोवाड चे माजी सरपंच विष्णू आढाव, तुडये चे माजी सरपंच मारुती पाटील, तुडये तसेच कोलिक गावचे सरपंच व कोरोना दक्षता कमिटी ,पोलीस पाटील उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks