ताज्या बातम्याराजकीय
राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस पदी डॉ. त्रिवेणी कुमार कोरे यांची निवड

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
राष्ट्रवादी जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस पदी डॉ. त्रिवेणी कुमार कोरे यांची निवड करण्यात आली. ही निवड प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील व जिल्हाध्यक्ष रोहित पाटील ह्यांच्या च्या मान्यतेने निवड करून पत्र दिले.डॉ. त्रिवेणीकुमार हे शालेय शिक्षणापासून सामाजिक क्षेत्रात आवड आणी उत्तम कार्यरत आहेत. त्यांच्या फ्रेंड्स फाउंडेशन च्या माध्यमातून त्यांनी अनेक जिल्ह्यात तालुक्यात ग्रामीण पातळीवर विविध उपक्रम राबवले आहेत. त्यांच्याकडे सामाजिक क्षेत्रात काम करणारा मोठा तरुण वर्ग कार्यरत आहे.आणी संपर्क जास्त आहे याची दखल घेत त्यांना आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसजिल्हा सरचिटणीस पद बहाल करण्यात आले. यावेळी त्यांनी पक्षवाढीसाठी आणि जास्तीत जास्त समाज कार्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले.