ताज्या बातम्या

“कानोली ग्रामविकास मंडळ मुंबई यांचेकडून आरोग्य उपकेंद्रास औषध साठा उपलब्ध”

आजरा प्रतिनिधी : पुंडलिक सुतार

शहराबरोबर ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव पाहताना दिसत आहे कानोली ता.आजरा सह पंचक्रोशीत गेले महिनाभरापासून कोरोना रुग्नांच्या संख्येत चढ उतार पाहताना दिसून येत असून लोकांच्यात भीतीचे वातावरण दिसून येत आहे.आणि म्हणूनच नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत सेवेसाठी कायम तत्पर असणाऱ्या कानोली ग्रामविकास मंडळ मुंबई यांच्यातर्फे आरोग्य उपकेंद्रास जाणवत असलेल्या व्हिटॅमिन व रोगप्रतिकार शक्ती वाढीच्या गोळ्या तसेच विविध उपयोगी साहित्यांचे वाटप अध्यक्ष मनोहर सावरतकर,उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील,सेक्रेटरी चंद्रकांत आपगे,सदस्य गोपाळ भोगण,विजयकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

या कार्यक्रमास आरोग्य विभाग कर्मचारी यांचेसह,सरपंच राजेंद्र मुरकुटे,ग्रामसेविका नाईक मॅडम,ग्रा.पं. सदस्य शिवाजी पाटील यांचेसह इतर मान्यवर उपस्तीत होते.

सामाजिक बांधिलकी जपत नेहमीच सेवेसाठी तत्पर असणाऱ्या व या कठीण काळात आवश्यक औषध साठा उपलब्ध करून दिलेबद्दल मुंबई मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे तंटामुक्त अध्यक्ष रमेश भोगण यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks