ताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वराज्य प्रतिष्ठान कडून गारगोटी कोविड सेंटर ला १ लाख १ हजार ची वैद्यकिय मदत ; बसरेवाडीचे युवा सरपंच संदिप पाटील यांचा एक हात मदतीचा अभिनव उपक्रम

गारगोटी प्रतिनिधी –

भुदरगड तालुक्यातील बसरेवाडीचे युवा सरपंच संदिप पाटील (आप्पा) यांच्या एक हात मदतीचा या अभिनव उपक्रमातून उभा केलेली रु १ लाख १ हजार रुपयाचे वैद्यकिय मदत त्यांच्या स्वराज्य प्रतिष्ठान च्या वतीने प्राचार्य अर्जून आबिटकर आदि प्रमुखांच्या हस्ते गारगोटी कोविड सेंटर ला प्रदान करण्यात आली.
आज सकाळी ११ वा गारगोटी कोविड सेंटर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास भुदरगड आजरा चे प्रांत संपत खिलारी, तहसिलदार अश्वीनी वरूटे या प्रमुख उपस्थीत होत्या.
यावेळी बोलताना प्राचार्य अर्जून आबिटकर म्हणाले की,कोरोना महामारीत सापडलेल्या कोरोना रुग्णांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या एक हात मदतीचा या अभिनव उपक्रमातून बसरेवाडीचे युवा सरपंच संदिप पाटील (आप्पा) यांनी जी एक लाखाच्या वर जी मोठी रक्कम उभा केली ती फार मोलाची आहे.अशा या मदतीमूळे या रुग्णावर वेळीच उपाचार होवून त्यांचे वेळीच प्राण वाचणार आहेत.ते या महामारीतून लवकर बरे होणार आहेत.सरपंच संदिप पाटील यांचा आदर्श आजच्या युवा पिढीने घ्यावा.प्रांत संपत खिलारी व तहसिलदार अश्वीनी वरूटे यांनीही या दात्याचे आभार मानले.
गारगोटी कोविड सेंटर चे वैद्यकिय अधिकारी डॉ मिलिंद कदम यांनी ही इंजेक्शन, औषधे, गोळ्यांची वैद्यकिय मदत सर्वांच्या वतीने स्विकारली.गारगोटी कोविड सेंटर चे वैद्यकिय अधिकारी डॉ मिलिंद कदम यांच्या या आरोग्य सेवेच्या सेवाभावी कार्याबध्दल प्राचार्य अर्जून आबिटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कोल्हापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकिय सदस्य कल्याणराव निकम, डॉ मिलिंद कदम यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी गारगोटी चे वनक्षेत्रपाल किशोर आहेर,पंचायत समिती भुदरगड चे माजी उपसभापती अजित देसाई,भुदरगड तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ.सचिन यत्नाळकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख अविनाश शिंदे, निळपण चे युवा नेते विक्रमसिंह पाटील, मिणचे बु चे लोकनियुक्त सरपंच सचिन गुरव, गारगोटी ग्रामपंचायतीचे सदस्य रणधिर शिंदे, सुशांत सुर्यवंशी, अजित चौगले, राजेंद्र चिले, पांडुरंग कांबळे, सुरज हळदकर, बाबुराव सारंग, विशाल वायदंडे, शरद वैराट, अभिजित देवेकर, हर्ष मेंगाणे, संदिप वैराट,सनि पाटील, परेश वाडेकर आदि उपस्थीत होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks