माजी मंत्री वीरकुमार पाटील यांना मातृशोक

कोगनोळी :
कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सुनंदा आप्पासाहेब पाटील यांचे वयाच्या 97 व्या वर्षी बुधवार तारीख 26 रोजी दुपारी दोन वाजता कोगनोळी येथील त्यांच्या वीरसदन या निवासस्थानी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
सायंकाळी पाच वाजता सुळकुड रोड वरील कोंढार मळा या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, अरिहंत उद्योग समूह बोरगावचे उत्तम पाटील यांच्यासह जिल्हा पंचायत, तालुका पंचायत सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा संस्था, युवक मंडळ यांचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
रक्षाविसर्जन गुरुवार तारीख 27 रोजी सकाळी आठ वाजता आहे.
तसेच उत्तरकार्य विधी सातव्या दिवशी मंगळवार तारीख 1 रोजी आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.