मराठा आरक्षण; शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने सलाईन लावून आंदोलनात दाखल

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यापासून राज्यात वादंग पेटले आहे . यापार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आंदोलनाची ठिणगी आज पडली आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वात आज कोल्हापूरमधून मूक आंदोलनाला सुरुवात झाली आहे . भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि वंचित बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सहभागी झाले आहेत. तसेच शिवसेनेचे खासदार धर्यशील माने सलाईन लावून आंदोलनात दाखल झाले आहे . मराठा समाजासाठी कोणत्याही परिस्थितीत असलो तरी उपस्थित राहणार अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. माने हे नुकतेच कोरोना निगेटिव्ह झाले आहेत .
आंदोलनाला सुरूवात झाल्यानंतर प्रारंभी संभाजीराजे यांनी उपस्थिती समुदायाला संबोधित केले . आजचे आंदोलन मूक असून, फक्त लोकप्रतिनिधीच बोलतील. उपस्थितांपैकी कुणीही लोकप्रतिनिधींना उलट सवाल करू नये. लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या. त्यांचं ऐकून घ्या, असे आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी सुरूवातीला केले . त्यानंतर लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका मांडण्यास सुरूवात केली.