# मराठा आरक्षण: संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

टीम ऑनलाईन :
मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असला, याच मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्राची प्रत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व सदस्यांनाही पाठविली आहे. संभाजीराजे यांनी हे पत्र ट्विट केले असून फेसबुकवरही पोस्ट केले आहे. या ट्विटमध्ये “मराठा आरक्षण सुनावणी प्रश्नी मुख्यमंत्र्यांना मी पत्र लिहिले. या पत्रामधून काही कायदेशीर व तांत्रिक बाबी स्पष्ट करण्याचा मी प्रयत्न केला आहे. या पत्राची प्रत शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व सर्व सदस्यांनादेखील दिली आहे,’ असे म्हटले आहे.