फराकटेवाडीच्या उपसरपंचपदी मानसिंग फराकटे यांची निवड

बिद्री ( प्रतिनिधी ) :
फराकटेवाडी ( ता. कागल ) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी खा. संजय मंडलिक गटाचे मानसिंग आनंदा फराकटे यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. शीतल फराकटे होत्या.
यावेळी बोलताना नुतन उपसरपंच मानसिंग फराकटे म्हणाले, ग्रामस्थ व नेतेमंडळींनी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला उपसरपंच म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. या संधीचा उपयोग गावच्या सर्वांगीण विकासासाठी करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करु.
यावेळी खा. संजय मंडलिक गटाचे प्रमुख व हमिदवाडा कारखान्याचे माजी संचालक आनंदराव फराकटे, आनंदा राजाराम फराकटे, माजी सरपंच नारायण फराकटे, सुहास फराकटे, ग्रा.पं. सदस्य युवराज फराकटे, शिवाजी फराकटे, तेजस्विनी फराकटे, विठ्ठल फराकटे, सुरेश फराकटे, बाळासो फराकटे, गणपती फराकटे, विकास फराकटे, डॉ.के.डी. फराकटे, संदिप आमते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामसेवक प्रदिप पोवार यांनी स्वागत केले, तर आभार संग्राम फराकटे यांनी मानले.