सडोली खालसा येथे सुपर आर्मी कडून तंबाखूच्या राक्षसाचे दहन

सावरवाडी प्रतिनिधी :
करवीर तालुक्यातील सडोली खा येथील संत गोरा कुंभार तरुण मंडळ व सलाम मुंबई फौंडेशनच्या च्या संयुक विध्यमाने होळी सणाचे औचित्य साधून तंबाखूच्या राक्षसाचे दहन सुपर आर्मी या लहान मुलांच्या प्रबोधन गटामार्फत करण्यात आले
यावेळी सुरक्षित अंतर ठेऊन, मास्क व शानिटायझर चा वापर करून हा कार्यक्रम पार पडला. या उपक्रमासाठी मोठा राक्षस तयार करून,या राक्षसाची धिंड पूर्ण गावातून काढण्यात आली. सुपर आर्मीच्या मुलींनी हातात तंबाखूमुळे होणारे दुष्परिणाम दर्शवणारी चित्रे हातात घेतली होती. तंबाखू मतलब खल्लास, अरे अरे भावा-खाऊ नको मावा, घोषणांनी परिसर दणाणून गेला होता .
गल्लोगल्ली फिरत टीमक्याच्या निनादात ही धिंड काढण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यापक श्री धनाजी कुंभार यांनी उपस्थितांना तंबाखू मुक्त जीवनाची शपथ दिली.
कोरोनाच्या काळात घ्यावयाची जबाबदारी व तंबाखूचे दुष्परिणाम या विषयावर म.गांधी व्यसनमुक्ती राज्य पुरस्कार प्राप्त अध्यापक एकनाथ कुंभार यांनी माहिती सांगितली.
मुलांनी कोरोनाच्या काळात सतत हात धुवावेत यासाठी मंडळाचे सदस्य श्री उमेश पांडुरंग कुंभार यांनी सहभागी मुलांना साबण व टूथपेस्ट चे वाटप केले.आभार सिद्धेश कुंभार यांनी मानले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यापक कृष्णात कुंभार, ग्रामपंचायत सदस्य जायशिंग कुंभार, सुनिल कुंभार, वसंत कुंभार,संदीप कुंभार, ऋषिकेश कुंभार, मारुती देसाई,निवास पाटील, सागर चव्हाण, शिवाजी चव्हाण यांनी विशेष विशेष प्रयत्न केले.