ताज्या बातम्यामहाराष्ट्र
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालात महात्मा फुले जयंती साजरी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
इतिहास विभाग व विवेक वहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालात महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. नितेश रायकर यांनी केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य शिवाजीराव होडगे सर यांनी महात्मा फुले यांनी लिहिलेल्या ग्रंथांचा आढावा घेत, मराठी साहित्यातील त्यांच्या चरित्र ग्रंथाचा उल्लेख केला. तर, आभार लेफ्टनंट प्रा. विनोदकुमार प्रधान सर यांनी मांडले.