ताज्या बातम्यामहाराष्ट्र
गलगलेत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवले

मुरगूड प्रतिनिधी :
गलगले (ता. कागल) येथे शेताकडे निघालेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञाताने लांबवले. इंदूबाई नाना पडळकर (वय ६५) यांनी याची फिर्याद मुरगूड पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. इंदूबाई पडळकर या आज सिध्देश्वर मंदिराकडील डोंगर नावाच्या शेताकडे निघाल्या होत्या. दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास काळ्या रंगाचा रेनकोट, पॅन्ट आणि बूट असलेल्या अज्ञाताने पळत येऊन गळ्यातील २३ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून लांबवले. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे करीत आहेत.