ताज्या बातम्यामहाराष्ट्र
करवीर : सातेरी महादेव मंदीर परिसरात भाविकाविना महाशिवरात्र उत्सव साजरा !

सावरवाडी प्रतिनिधी :
बाराव्या शतकात प्राचीन ऐतिहासिक महत्व जपणाऱ्या सातेरी महादेव रम्य परिसरात आज गुरूवारी कोरोनाच्या पाश्वभूमीवर भाविकाविना साधेपणाने महाशिवरात्र उत्सव साजरा झाला .
मंदीरात मोजक्याच पुजारी लोकांच्या हस्ते अभिषेक सोहळा झाला . सकाळी काकड आरती झाली . दिवसभर कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर बंद दर्शनासाठी बंद होते . दिवसभर भाविकच नसल्यामुळे महाशिवरात्र उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा झाला .